वाळू माफियांविरोधात गुप्ता यांची तक्रार

Dipak kumar gupta

जळगाव: जळगाव शहरासह जिल्हयात अवैध वाळूचा विषय गेल्या कित्येक दिवसांपासू सुरु आहे. अवैध वाळू चोरी तसेच वाळू माफीयांविरोधात सातत्याने माहिती मागवून आवाज उचलण्याचे काम सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिपक कुमार गुप्ता करत आहेत.

परवा 17 जून रोजी काही टोळक्याने दिपक गुप्ता यांची वाट अडवून त्यांच्या वाहनाची चावी काढून घेण्याचा प्रकार झाला. या प्रकरणी दिपक कुमार गुप्ता यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. मात्र या टोळक्याने या घटनेचा व्हिडीओ तयार केला होता. तो व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. तो व्हिडीओ गुप्ता यांच्या हाती लागल्याने त्यांनी आपल्याला धमकी देणा-या टोळक्याविरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की विठ्ठल पाटील (पुर्ण नाव माहिती नाही), मोगली (पुर्ण नाव माहिती नाही), विक्की (पुर्ण नाव माह्ती नाही), वैभव (पुर्ण नाव माहिती नाही) तसेच इतर तिन जणांनी दिपककुमार गुप्ता यांना 17 जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेन गेट जवळ थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गुप्ता तेथे न थांबता सरळ निघून गेले होते. दुपारी तिन ते चार वाजेच्या दरम्यान शिवाजी नगर भागात या सर्व जणांनी गुप्ता यांना अडवले.

गुप्ताजी तुम्ही आमची तक्रार का करता. तुम्ही आमची तक्रार करतात याबाबत आम्हाला तहसीलदार वैशाली हिंगे तसेच प्रांताधिकारी दिपमाला चौरे यांनी सांगीतले आहे. तुम्ही आमची तक्रार करणे बंद करा अन्यथा आम्ही तुमचे  काम खराब करु अशी धमकी या सर्व जणांनी गुप्ता यांना दिली.

या प्रकरणी भा.द.वि. 341, 143, 504, 506 नुसार दिपक कुमार गुप्ता यांनी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here