जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी

On: September 28, 2026 8:04 PM

जळगाव दि. २८ प्रतिनिधी –  जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच तोंडापूर कॅरम प्रेमीतर्फे आयोजित स्व. कासम शेख स्मृती जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत तमन्ना क्रीडा संस्थेचा रईस शेख  याने जैन स्पोर्ट्स अकॅडमी जळगावच्या नईम अंसारीचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. रईस शेख याला रोख रुपये ४०००/- व चषक तसेच  नईम अन्सारीला रोख रुपये तीन हजार व चषक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत भुसावळ येथील दानिश शेख याने तिसरा क्रमांक व जळगाव येथील सय्यद मोहसिन याने चतुर्थ क्रमांक पटकाविला. त्याचप्रमाणे आसीम शेख (जामनेर), वसीम खान (जळगाव), आरिफ शेख (जामनेर) व फिरोज खान (जळगाव) यांनी अनुक्रमे पाच ते आठ क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.

स्पर्धेत जिल्ह्यातील ६४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत एकूण तीन खेळाडूंनी ओपन टू फिनिशची नोंद केली त्यात वसीम शेख (जामनेर), नईम अन्सारी (जळगाव),  दानिश शेख (भुसावळ ) यांचा समावेश होता. स्पर्धेतील अनुक्रमे एक ते आठ क्रमांकाचे रोख पारितोषिक ज्ञानेश्वर पाटील, शरद पवार, दत्तात्रय कानडजे, नाटूबा जाधव, रघुनाथ पाटील, सलमान शेख, जमील पठाण व मुक्ताई कृषी केंद्र यांनी पुरस्कृत केली होती. पहिल्या चार क्रमांकाच्या विजयी स्पर्धकांना शरद ऍग्रो एजन्सी जामनेरच्या नितीन शरद पाटील यांनी चषक पुरस्कृत केले होते. प्रमुख पंच म्हणून गणेश लोडते, सहाय्यक प्रमुख पंच म्हणून चंद्रशेखर नरवरिया, बोर्ड पंच म्हणून साकिब अन्सारी, जैद शेख , सय्यद जुनेद, संतोष हायलिंग, बबलू अन्सारी व इतर खेळाडू आणि बंडू कलाल व सलीम पटेल यांनी सहकार्य केले. 

पारितोषिक वितरणाप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर केशव पाटील, महाराष्ट्र राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष मंजूर खान, स्पर्धेचे प्रमुख आयोजक रंगनाथ पाटील, दत्तात्रेय कानडे, गुजरातचे चंदू जोशी, रघुनाथ पाटील (जया फोटो), नाटूबा जाधव, दीपक कैलास पाटील, आबा पाटील, नाना पाटील, फिरोज खान व इत्यादी पाहुण्यांची प्रमुख उपस्थिती होती. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment