आंतरजिल्हा वरिष्ठ गट पुरुष क्रिकेट निवड चाचणी रविवारी

On: November 19, 2026 3:43 PM

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरजिल्हा वरिष्ठ गट पुरुष क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड करण्याकरिता निवड चाचणीचे आयोजन रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता करण्यात आले आहे.

ही निवड चाचणी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे मैदान, मेहरूण रोड, डी-मार्टजवळ, जळगाव येथे पार पडणार आहे. सर्व इच्छुक खेळाडूंनी खाली दिलेल्या लिंकद्वारे Google Form ऑनलाइन भरून आपला सहभाग नोंदवावा. फॉर्म भरताना आधार कार्डचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन नोंदणी लिंक:
https://forms.gle/n5BcHwLC6wbLXyVK8

निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी क्रिकेटचे साहित्य, पांढरा गणवेश (White Dress), क्रिकेट शूज तसेच मूळ आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अतुल जैन यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

  • सचिव – अरविंद देशपांडे (९४०४९५५२०५)
  • सहसचिव – अविनाश लाठी (९८२२६१६५०३)
  • मोहम्मद फजल (७८७५४६३०३२)

टीप :
१. सर्व खेळाडूंनी ऑनलाइन फॉर्म भरणे अनिवार्य आहे.
२. निवड चाचणीसाठी प्रवेश शुल्क ₹१०० रोख स्वरूपात सोबत आणावे.
३. ही निवड चाचणी केवळ जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आहे. इतर जिल्ह्यांतील खेळाडूंना या निवड चाचणीत प्रवेश दिला जाणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment