गोवंश कत्तल करणा-या टोळीतील दोघे सहा महिने हद्दपार

On: November 2, 2026 10:21 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गोवंश कत्तल व मांस विक्री करणा-या गुन्हेगारी टोळीविरुद्ध जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कठोर कारवाई केली आहे. नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी टोळी तयार करून गोवंश कत्तल व मांस विक्रीचे गुन्हे करणाऱ्या टोळी प्रमुख मुक्तार जमाल कुरेशी व टोळी सदस्य परवीनबी मुक्तार कुरेशी (दोन्ही रा. फातेमा नगर, जळगाव) यांना जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

या दोघांविरुद्ध जळगाव एमआयडीसी व नशिराबाद पोलिस स्टेशनला पशु संरक्षण अधिनियमानुसार गुन्हे दाखल आहेत. या दोघांविरुद्ध एमआयडीसी व नशिराबाद पोलिस स्टेशनला वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया देखील करण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment