गांधी विचारात विश्व शांती – डॉ. के. बी. पाटील

जळगाव : संपूर्ण विश्वात कोरोना महामारीसह अशांतता निर्माण झाली आहे. अमेरिकेसह शांतीचे प्रवक्ते असणाऱ्या देशांमध्ये परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिघडत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर जग तिसरे महायुद्ध बघेल. मानवासमोर आलेले हे संकट टाळायचे असेल तर महात्मा गांधींचे विचार आचरणात आणायला हवे. अशांत जगात शांतीचा संदेश दिला पाहिजे. असा संदेश माजी कुलगुरु डॉ. के.बी. पाटील यांनी दिला आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या तसेच लाल बहादुर शास्त्री यांच्या 116 व्या जयंती निमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यानात महात्मा गांधींच्या पुतळ्याला सुतिहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ. के. बी. पाटील आपले विचार व्यक्त करत होते.

गांधी रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. जॉन चेल्लादूराई, उदय महाजन, अनिल जोशी, नितिन चोपडा व इतर सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी शासकीय नियमांचे पालन करण्यात आले. डॉ. के. बी. पाटील पुढे म्हणाले की, जगात प्रत्येक देशांकडे विध्वंसक हत्यारे वाढली आहेत. सध्या तिसऱ्या महायुद्धाची स्थिती आहे. त्यामुळे जग अशांत आहे. अहिंसेतूनच मन:शांतीकडे जाता येते. त्यासाठी गांधीजींनी सांगितलेल्या विचारांवर मार्गक्रमण करणे आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here