प्रदिप चांदेलकर यांची फौजदारपदी बढती

जळगाव : एरंडोल पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले प्रदिप चांदेलकर यांची फौजदारपदी बढती झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील एकुण २३ कर्मचारी फौजदार झाले आहेत. सन १९८८ पर्यंत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेच्या आधारे ही नियुक्ती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारने सन २०१३ मध्ये खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या राज्यातील १०६१ जणांना फौजदार केले आहे. यात जळगाव जिल्हा पोलीस दलातील एकुण २३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस महासंचालक कायार्लयातील आस्थापणाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी मंगळवारी याबाबतचे आदेश काढले आहेत.
गेल्या कित्येक वषार्पासून या कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरु होता. उच्च न्यायालयाने या सर्व कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचे आदेश दिले होते. सन १९८८ पर्यंत भरती झालेल्या या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेच्या आधारे सदर नियुक्ती दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील राजाराम भोई, अंबादास पाथरवट, गोकुळसिंग बयास, राजू मोरे, सुनील वाणी, रवींद्र गिरासे, रामकृष्ण पाटील, कल्याण कासार, प्रदीप चांदेलकर, राजेंद्र बोरसे, मगन मराठे, चंद्रसिंग पाटील, नरसिंग वाघ, मोहन लोखंडे, गंभीर शिंदे, शेख मकसूद शेख बशीर, इरफान काझी, सुनील पाटील, चंद्रकांत पाटील, अरुण सोनार, राजेंद्र साळुंखे, किशोर पाटील व चंद्रकांत बुधा पाटील यांचा यात समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here