नंदूरबारनजीक ४० फूट खोल दरीत कोसळली बस – ५ मृत्युमुखी, ३५ जखमी

On: October 21, 2020 11:52 AM

नंदूरबार : धुळे-सूरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात अतिशय भीषण अपघात झाला. जळगावहून सूरतच्या दिशेने जाणारी खासगी बस कोंडाईबारी घाटातील दर्ग्याजवळ असलेल्या पुलावरून ४० फूट खोल दरीत वेगाने कोसळली. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू ओढवला असून ३५ प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

या भीषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींवर विसरवडी, नवापूर व नंदुरबार येथील रुग्णालयांत तातडीने वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले आहेत. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी भीषण घटना घडली आहे.

या भीषण अपघाताची माहिती समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून ५ मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या अपघाताची घटना नेमकी कशी झाली याचा शोध घेतला जात आहे. घटनेच्या वेळी बसमध्ये एकुण ४० प्रवासी होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment