आजचे राशी भविष्य (28/10/2020)

मेष : प्रयत्नांची पराकाष्ठा कायम ठेवावी. रागाच्या भरात घेतलेले निर्णय त्रासदायक ठरु शकतात.

वृषभ : सकारात्मक विचार वाढीस लावण्याची क्षमता वाढेल. कष्टाविना फळ मिळणे कठिण राहिल.

मिथुन : प्रलंबित कामे मार्गी लागल्याने समाधान लाभेल. आर्थिक प्रयत्न फळाला येतील.

कर्क : आजचा दिवस फलदायी असेल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे चुकीचे ठरेल.

सिंह : वाणीतील मधुरता आपली कामे पार पाडेल. प्रवास लाभदायक ठरु शकतो.

कन्या : विरोधकांच्या कारवाया असफल ठरतील. अनेक गोष्टी मनाप्रमाणे होतील.

तुळ : कामाचा व्याप वाढल्याने दगदग होईल. धनलाभ होवू शकतो.

वृश्चिक : व्यवसायिक योजना आकार घेतील. महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकल्यास उचित ठरु शकते.

धनु : कामाचा कंटाळा करुन चालणार नाही. आळस झटकून सतर्क राहून कामे करावी लागतील.

मकर : आपल्या वक्तव्यामुळे कुणाचा गैरसमज होणार नाही हे बघावे लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

कुंभ : कौटूंबिक जबाबदा-या वाढतील. आजचा दिवस उत्तम राहील.

मीन : मानसिक स्वास्थ लाभेल. उत्पन्नाचे नविन मार्ग सापडतील.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here