गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार नवनीत राणा निर्दोष मुक्त

legal

अमरावती : लोकसभा निवडणूक 2019 कालावधीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख तसेच अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने अनिल देशमुख व नवनीत कौर राणा यांच्यासह 16 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, खा. नवनीत राणा यांच्यासह 16 जणांवर अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस स्टेशनला कलम 188 अंतर्गत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या खटल्याप्रकरणी निकाल देतांना अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमुर्ती एफ.ए. देशपांडे यांनी सर्व आरोपीं निर्दोष मुक्त केले. फिर्यादी पक्षाने या प्रकरणी थेट न्यायालयात धाव घेण्याऐवजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे फिर्यादी पक्षाने केलेली याचिका न्यायालयाने रद्दबातल ठरवत, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

सन 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत नवनीत कौर राणा यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समर्थन मिळाले होते. नवनीत कौर राणा यांनी भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रॅलीच्या वेळी विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख, डॉ. राजेंद्र गवई, रावसाहेब शेखावत, बाबा राठोड, हर्षवर्धन देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी हजर होते.

नवनीत कौर राणा यांनी आदर्श आचारसंहीतेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक नियंत्रण कक्षाचे फ्लाईंग स्कॉड अधिका-यांनी गाडगे नगर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. जिल्ह्यात जमावबंदी कायदा लागू असताना रॅली काढली म्हणून आचारसंहीतेचा भंग केल्याचा कलम 188 नुसार तो गुन्हा दाखल करण्यात आला होता.

निवडणूक नियंत्रक अधिकारी जितेंद्र देशमुख यांनी थेट न्यायालयात धाव न घेता पोलिसांत तक्रार दाखल केल्याने न्यायालयाने याचिका रद्दबातल ठरवत सर्वांची निर्दोष मुक्तता केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here