जिवे मारण्याच्या प्रयत्न करणारा बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : मागील भांडणाच्या कारणावरुन तरुणास घराच्या गच्चीवरुन फेकून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील फिर्यादी तरुण अजय गिरधारी गोडाले यास आरोपी देवेंद्र विनोद जावरे याने गच्चीवरुन फेकून देण्याचा प्रयत्न केला होता.

या गुन्ह्यातील देवेंद्र विनोद जावरे याच्या विरुद्ध भाग 5 गु.र.न. 916/20 भा.द.वि. 307, 506, 34 नुसार गुन्हा दाखल आहे. पो.नि. दिलीप भागवत यांना मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी देवेन्द्र उर्फ बापू विनोद जावरे यास गुन्हे शोध पथकातील कर्मचा-यांच्या मदतीने शिताफीने पकडण्यात आले.

पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अनिल मोरे, मंगेश गोटला, सहायक फौजदार तस्लिम पठाण, पो.ना.रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, समाधान पाटील,उमाकांत पाटील, तुषार पाटील, पो.का. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, चेतन ढाकणे, योगेश महाजन,दिनेश कापडणे, सुभाष साबळे,सचिन चौधरी व होम गार्ड सुरळकर यांनी या कारवाईत सह्भाग घेतला. पुढील तपास स.पो.नि. अनिल मोरे व पो.ना.समाधान पाटील करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here