महसुल कर्मचा-यांनी केला एकदिवसीय देशव्यापी संप

जळगाव :- राज्यासह देशातील कामगार- कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आज 26 नोव्हेंबर रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारण्यात आला. राज्य व देशातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केंद्र व राज्य स्तरावरील समस्यांकडे या संपाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. देशातील सुमारे 20 कोटी कामगार-कर्मचारी या संपात सहभागी झाले.

शासनाने बदललेल्या धोरणामुळे कामगार कर्मचारी वर्गाचे अस्तित्व उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले जात आहे. बदलत्या काळानुसार कर्मचा-यांच्या मागण्यांचे स्वरुप देखील बदलले आहे. कामगार कर्मचा-यांच्या रास्त मागण्यांसाठी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने एक दिवसीय संप पुकारला होता.

या संपात जिल्ह्यातील सर्व पंधरा तहसिल कार्यालये, सात उपविभागीय अधिकारी कार्यालये व जिल्हाधिकारी कार्यालय असे सर्व महसूल कर्मचारी सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचारी संघटना व राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने निदर्शने करत घोषणा देण्यात आल्या. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रातिनिधीक शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिका-यांना यावेळी निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here