घराचा स्लॅब कोसळल्याने तरुण ठार

On: December 3, 2020 10:41 PM

रावेर (भुषण महाजन) : रावेर तालुक्यातील के-हाळा या गावी जुन्या घराचे खोदकाम सुरु असतांना अचानक स्लॅब कोसळला. या घटनेत काम करणारा तरुण ठार झाल्याच्या घटनेने के-हाळा गावी शोककळा पसरली आहे.

वैभव वासुदेव महाजन यांच्या घराच्या पायाचे खोदकाम सुरु होते. त्यावेळी अचानक घराचा स्लॅब कोसळल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. या घटनेत के-हाळा खुर्द येथील काम करणारा फिरोज रुबाब तडवी (30) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पुर्वीच त्याचे निधन झाले होते.

डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले. हलाखीची परिस्थिती असलेला होतकरु तरुण मजुरी करत असतांना मयत झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत फिरोज याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परीवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment