मागच्या खिशात लाच ठेवून घेणारी महिला पोलिस निलंबीत

On: December 18, 2020 5:07 PM

पिंपरी : शहर वाहतुक शाखेच्या पिंपरी विभागातील महिला वाहतुक पोलिस कर्मचारी यांनी दुचाकीस्वार तरुणीकडून लाच घेतल्याचा व्हिडीओ सर्वत्र प्रसारीत झाल्याचे पडसाद उमटले आहे.

स्वाती सोन्नर असे त्या महिला पोलिस कर्मचा-याचे नाव असून त्यांनी दंडात्मक कारवाई एवजी दुचाकीस्वार तरुणीकडून पॅंटच्या मागच्या खिशात लाचेची रक्कम ठेवून घेतली होती. त्यानंतर ती दुचाकीस्वार तरुणी निघून गेली होती. सदर व्हिडीओ क्लिप व्हायरल होताच सर्वत्र हा चर्चेचा विषय झाला होता.

वाहतुक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त यांच्या मार्फत पोलिस उपायुक्तांकडे याप्रकरणी अहवाल सादर झाला. त्यानंतर सायंकाळी स्वाती सोन्नर यांना निलंबीत करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment