टपाल तिकिटावर गुंड छोटा राजन, मुन्ना बजरंगीचा फोटो

नवी दिल्ली: टपाल तिकिटावर गुंड मवाली आणि अंडरवर्ल्ड माफियांचे फोटो छापले जाऊ शकत नाही. त्यासाठी यंत्रणा काटेकोर असायला हवी.यंत्रणेत त्रुटी असल्यास काहीही होऊ शकते याचे एक उदाहरण समोर आले आहे. कानपूर येथील मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये हा प्रकार घडला आहे.

कानपूर येथील मुख्य टपाल कार्यालयातून आंतरराष्ट्रीय डॉन छोटा राजन व बागपत तुरुंगातील गँगवॉरमध्ये मारला गेलेला मुन्ना बजरंगी या दोघांचे फोटो असलेली टपाल तिकिटे जारी झाली आहेत. या तिकिटांचा वापर करुन पत्रव्यवहार करता येवू शकतो.

भारतीय टपाल खात्याने ‘माय स्टँप’ योजनेच्या अंतर्गत छोटा राजन आणि मुन्ना बजरंगी यांचे फोटो टपाल तिकिटं प्रसिद्ध केली आहेत. पाच रुपये मूल्य असलेली छोटा राजनची बारा आणि मुन्ना बजरंगीची बारा तिकिटे छापण्यात आली आहेत.

टपाल विभागाला या मोबदल्यात सहाशे रुपयांचे शुल्क मिळाले आहे. तिकिटे छापण्या अगोदर फोटोंची पडताळणी गरजेची असते. ती पडताळणी टपाल विभागाने केली नाही.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here