सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांना विस वर्षाची सक्तमजुरी

legal

औरंगाबाद : औरंगाबाद येथील मुकुंदवाडी परिसरात 5 ऑक्टोबर 2017 रोजी एका बाविस वर्षाच्या विवाहितेवर सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी तिघा आरोपींना विस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायालयाचे न्या. संजय कुलकर्णी यांनी एससी आणि एसटी (पीओए) कायद्यानुसार सदर शिक्षा सुनावली आहे. सागर सुभाष बुट्टे (20) रा. जयभवानीनगर, ग. न.5, अनिल अंबादास डुकले (26) रा. जयभवानीनगर, ग. न. 1, उमेश उत्तम डुकले (22) रा. जयभवानीनगर, ग. न. 1 यांचा शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहे.

जयभवानीनगर चौकात पिडीत विवाहित महिला 5 ऑक्टोबर 2017 रोजी रात्री 8 वाजता उभी होती. त्यावेळी तिघे आरोपी रिक्षाने आले. विवाहितेस रेल्वे स्टेशनला सोडण्यासाठी त्यांनी तिला रिक्षात बसवले. रिक्षात गॅस भरण्याचे कारण सांगून त्यांनी तिला मुकुंदवाडी येथील रामकाठी येथे नेले. तेथील एका निर्जन खोलीत त्यांनी तिला नेले. अगोदर तेथे त्यांनी महिलेस रॉडने मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. तसेच जिवे ठार करण्याची धमकी देखील दिली.

पीडित विवाहितेच्या तक्रारीनुसार तिघा आरोपीविरोधात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुकुंदवाडी पोलिसांकडून तिघा आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयीन कामकाजाला सुरुवात झाली होती. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारपक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. घटनेच्या वेळी पीडितेच्या अंगावर 14 जखमा असलेला वैद्यकीय अहवाल व साक्ष महत्त्वाची ठरली. याप्रकरणी आज शुक्रवारी न्यायालयाने तिघा आरोपींना विस वर्ष सक्तमजुरीसह 99 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पिडीतेला मोबदला म्हणून देण्याचे आदेश बजावण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here