निर्वस्त्र न करता केवळ छातीला स्पर्श करणे म्हणजे लैंगिक अत्याचार नाही – उच्च न्यायालय

मुंबई : अल्पवयीन मुलगा किंवा मुलीस निर्वस्त्र न करता केवळ छातीला स्पर्श करणे म्हणजे लैंगिक अत्याचार म्हणता येत नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायलयाने दिला आहे. कपडे न काढता केवळ स्पर्श करण्याच्या कृत्यास लैंगिक अत्याचार म्हणता येणार नाही. सदरचे कृत्य लैंगिक अत्याचाराच्या परिभाषेत मोडत नाही. असे कृत्य भा.द.वि. 354 अंतर्गत महिलांच्या चरित्र्यहननाचा अपराध असू शकतो. त्यामुळे या प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपीस किमान एक वर्ष शिक्षा होऊ शकते, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

नागपूर शहरात सन 2016 मधे 39 वर्षाच्या सतीष नावाचा आरोपीने एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीस सामान देण्याच्या बहाण्याने घरी नेले होते. त्यावेळी आरोपीने त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सतीषवर लावण्यात आला होता. त्या घटनेनंतर आरोपी सतीष याच्यावर पोक्सो कायद्यानुसार तिन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

सत्र न्यायालयाच्या या निर्णयात संशोधन करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पिठाने सतिष नावाच्या आरोपीच्या शिक्षा कमी केली व त्याला केवळ एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here