इंडीया टुडेचे राजदीप सरदेसाई यांना चौदा दिवस टीव्ही बंदी

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिस गोळीबारात शेतक-याचा मृत्यू झाला असल्याची चुकीची बातमी दिल्यामुळे इंडीया टुडेचे सल्लागार संपादक असलेले राजदीप सरदेसाई यांना त्रासदायक ठरले आहे. कंपनी व्यवस्थापनाने त्यांना चौदा दिवस टीव्ही वर येण्यास मनाई केली असून त्यांचे एक महिन्याचे वेतन देखील कपात केले आहे.

शेतकरी आंदोलनादरम्यान शेतक-याचा मृत्यू झाला असून त्याचे बलीदान वाया जाणार नसल्याचे शेतक-यांनी आपणास सांगितले असल्याचे सरदेसाई यांनी ट्वीट केले होते. दरम्यान त्या शेतक-याचा मृत्यू हा ट्रॅक्टर उलटल्यामुळे झाला असल्याचे पोलिसांनी व्हीडीओच्या माध्यमातून स्पष्ट केले.

दरम्यान इंडीया टूडेच्या एका न्युज क्लिपमधे एका पत्रकारासोबत सरदेसाई बोलत असतांना शेतक-याचा गोळीबारात निधन झाल्याचे सांगत असल्याचे दिसून आले. ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्यामुळे ते उलटले व त्यात शेतक-याचे निधन झाले असल्याचे पोलिसांनी दाखवल्यानंतर राजदीप सरदेसाई यांनी आपले वक्तव्य बदलले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here