मी न्यायालयात जाणार नाही तिथे न्याय मिळत नाही – माजी सरन्यायधिश रंजन गोगोई

मुंबई : देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झालेली आहे. तिथे जावून पश्चाताप करुन घेण्यासमान असल्याचे गंभीर वक्तव्य माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी एका खासगी चॅनलच्या कार्यक्रमात बोलतांना केले आहे.

आपल्यावरील लैंगिक छळाचा निवाडा माजी सरन्यायाधिश गोगोई यांनी स्वत:च केला असल्याचा आरोप तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केला आहे. या आरोपाविरुद्ध न्यायलयात आव्हान देणार का? असा प्रश्न गोगोई यांना विचारला असता त्यांनी सदर वक्तव्य केले. देशातील एकंदर न्यायव्यवस्थेबाबत माजी सरन्यायधिश रंजन गोगोई यांनी भाष्य केले आहे.

देशाची न्यायव्यवस्था जिर्ण झाली असून तेथे गेल्यावर पश्चाताप होतो. त्याठिकाणी आपण केवळ मळालेले कपडे धुण्याचे काम करतो. बड्या कंपन्यांना न्यायालयात जाणे परवडते. संपत्तीच्या वादात कित्येक जण ट्रायल केसेस बंद करत असतात. काही जण उच्च न्यायालयात मात्र सर्वोच्च न्यायालयात कोण जात? असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी विचारला. कोरोनाची देशात लहर आल्यानंतर सन 2020 मधे कनिष्ठ न्यायालयात 60 लाख, उच्च न्यायालयात तिन लाख आणि सर्वोच्च न्यायालयात 7 हजार खटल्यांची भर पडली असल्याचे त्यांनी बोलतांना म्हटले आहे. ज्यावेळी व्यवस्था बिघडलेली असते तेव्हा चांगल्या व्यक्ती देखील प्रभावहीन ठरत असल्याची खंत गोगोई यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here