पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची भाषणे कोण लिहून देतो अशी विचारणा माहिती अधिकार कायद्याखाली करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज कुठे ना कुठे कोणत्या तरी विषयाला अनुसरुन भाषण देत असतात. त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट कोण लिहून देतो अशा आशयाची विचारणा इंडीया टूडेच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यांची भाषणे लिहून देणा-या व्यक्तींची नावे आणि फोन अथवा मोबाईल क्रमांकाच्या माहितीसह त्याकामी किती मोबदला दिला जातो याची देखील मागणी माहिती अधिकार कायद्याखाली करण्यात आली होती.
पंतप्रधानांना भाषण देण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती जमा करुन दिली जाते. त्या माहितीच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:च भाषणाचा मजकूर तयार करतात अशी माहिती उत्तरादाखल देण्यात आली आहे. जसा कार्यक्रम असेल त्यानुसार माहितीचे स्वरुप त्यांना देण्यात येते. त्याकामी किती खर्च येतो याचा खुलासा मात्र दिला गेला नसल्याचे सांगीतले जात आहे.