सत्तर फुट खोल कोसळून देखील तिघे सुखरुप

संगमनेर : अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या थरारक घटनेत भरधाव वेगातील कार सत्तर फुट खोल कोसळून देखील तिघे प्रवासी सुखरुप विनादुखापत बचावले आहे. विशेष म्हणजे माहुली घाटात या भरधाव वेगातील कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कोसळलेल्या कारने सलग पाच वेळा गिरक्या घेत उलटण्याचा प्रकार घडला.

गुजरात राज्यातील तिन तरुण त्यांच्या ताब्यातील मारुती कारने देवदर्शनाच्या निमीत्ताने पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गाने भिमाशंकरच्या दिशेने जात होते. आज रविवारच्या सकाळी सहा वाजता तिघे जण माहुली घाटातून मार्गक्रमण करत होते. त्यावेळी अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. अंदाज चुकल्यामुळे कार थेट महामार्ग सोडून जवळपास सत्तर फुट खोल दरीत कोसळली.

या भिषण अपघाताच्या घटनेत कारने सलग पाच वेळा गटांगळ्या घेतल्या. तरी देखील तिघे तरुण सुखरुप राहिले. कुणाला दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती समजताच महामार्गासह घारगाव पोलिस पथकाने घटनास्थळी भेट दिली. तिघे तरुण बचावले असले तरी कारचे मात्र नुकसान झाले आहे. या ठिकाणी यापुर्वी एक कार व ट्रक देखील उलटण्याची घटना घडलेली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here