सचिन वाझे यांचा पाठलाग करणा-या वाहनाची चौकशी

मुंबई : स.पो.नि. सचिन वाझे यांची एटीएसने दहा तास चौकशी केली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी बोलतांना वाझे यांनी स्पष्ट केले आहे की आपण ते स्कॉर्पिओ वाहन वापरले नसून धनंजय गावडे यांना ओळखत नाही.

आरोपांच्या वादळात सापडलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे स्वत:हून एटीएसच्या चौकशीला सामोरे गेले असल्याचे समजते. आपल्या गाडीचा कुणीतरी वाहनाने पाठलाग करत असून त्याचा नंबर बनावट असल्याचा दावा वाझे यांनी केला होता. या पाठलाग व पाळत प्रकरणी वाझे एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांची भेट घेणार असल्याचे समजते.

पोलिसांचा फलक लावून आपल्या वाहनाचा MH 45 7W 4887 या क्रमांकाचे वाहन पाठलाग केला जात असल्याचे वाझे यांनी म्हटले आहे. मात्र हा क्रमांक बनावट असल्याचे देखील स.पो.नि. वाझे यांचे म्हणणे आहे. याच वाहनाच्या मागील बाजूने प्लेटवर MH 7W 4887 असा क्रमांक दिसत असल्यामुळे नंबर प्लेटमधे छेडखानी केल्याचे देखील स्पष्ट होत असल्याचे वाझे यांचे म्हणणे आहे. स.पो.नि.सचिन वाझे यांच्या वाहनाचा पाठलाग करणा-या वाहनाची चौकशी सुरु झाली असून ते वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. हे वाहन कुणाचे आहे हा प्रश्न पुढे आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here