हुंड्यासाठी दबाव टाकणे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे – अलाहाबाद उच्च न्यायालय

पुरावा असेल तरच आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप सिद्ध होऊ शकतो आणि हुंड्यासाठी दबाव आणणे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आत्महत्या प्रकरणी सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने भा.द.वि. 306 नुसार दाखल करण्यात आलेले आरोपपत्र रद्द करुन हुंडा छळप्रकरणी खटल्याचे कामकाज चालवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी दंडाधिकारी मेरठ यांना दिले आहेत.

मेरठ येथील आनंद सिंह यांच्यासह इतरांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्या. पंकज भाटीया यांच्या एकल खंडपीठाने हा आदेश दिला आहे. आनंद सिंह व त्यांच्या परिवारातील सदस्यांविरुद्ध मेरठ येथील प्रतापपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद सिंह यांच्यावर आरोप करण्यात आला आहे की त्यांनी पीडीतेसह तिच्या परिवारावर लग्न करण्यासाठी दबाव आणत भरमसाठ रकमेची मागणी केली.

लग्नाच्या काही दिवस अगोदर पिडीतेने स्वत:ला पेटवून घेतले. उपचारादरम्यान तिचे दिल्ली येथील सफदरगंज रुग्णालयात निधन झाले. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे की हुंड्यासाठी दबाव आणणे आत्महत्येला प्रवृत्त करणे होत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here