जळगाव – औरंगाबाद महामार्गाच्या कामात भ्रष्टाचाराची तक्रार

औरंगाबाद : जळगाव – औरंगाबाद महामार्ग सतत वादाचा विषय होत आहे. गेल्या काही महिन्याआधी साामाजीक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी या महामार्गाची तक्रार केली होती. आता या महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार औरंगाबाद येथील सामाजीक कार्यकर्ते अजहर सय्यद व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष मंगेश साबळे यांनी केली आहे.

फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा – फुलंब्री – खुलताबाद महामार्ग क्रमांक 752 येथे सुरु असलेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप या दोघांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केला आहे. या कामात अनिमितता आढळून आल्याची तक्रार करण्यात आली आहे. या रस्त्याची उंची 300 एमएम हवी असतांना ती 150 एमएम एवढी ठेवली असल्याची तक्रार आहे. रस्त्याची पिक्यूसी फाटत असून रस्त्यात गवत उगवत असल्याची देखील तक्रार आहे. या कामात हलक्या दर्जाचे सिमेंट व लोखंडाचा वापर केला जात असल्याची देखील तक्रार करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here