अमरावती एलसीबीने पकडला स्फोटक पदार्थ विक्रेता

अमरावती : अमरावती ग्रामीण अंतर्गत तिवसा पोलिस स्टेशन हद्दीतील पंचवटी चौकात कुणीतरी 200 नग जिलेटीन व 200 नग डिटोनेटर अशी स्फोटके फेकून पळ काढला होता. या घटनेची स्थानिक गुन्हे शाखेच्या गस्तीवरील पथकाला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली.

खब-यांच्या व विशेष कौशल्याचा वापर करत पथकाने सुमीत अनिल सोनोने रा. सातरगाव यास शिताफीने ताब्यात घेत चौकशी केली. सदर स्फोटके त्याने अंकुश लांडगे (रा. करजगाव लोणी) यास विक्री केले होते. पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजताच स्फोटके खरेदीदार अंकुश लांडगे हा पळून जाण्यात यशस्वी झाला. ताब्यातील स्फोटक पदार्थ विक्रेता सुमीत अनिल सोनोने यास तिवसा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध गु.र.न. 94/21 भा.द.वि. स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 कलम 5, 9, (ब) (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या तपासकामी अमरावती ग्रामीण पोलिस अधिक्षक हरी बालाजी एन, अप्पर पोलिस अधिक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. तपन कोल्हे यांच्यासह पो.उ.नि. विजय गराड, सहायक फौजदार मुलचंद भांबुरकर, हे.कॉ. सुनिल केवतकर, नाईक पो.कॉ. बळवंत दाभणे, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, चालक राहुल सोलव तसेच सायबर सेलच्या म.पो.कॉ. सरिता चौधरी यांनी तपासात सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here