वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर मुलगी आक्षेप घेऊ शकते – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : वडीलांच्या दुस-या विवाहावर मुलगी आक्षेप घेऊ शकते, प्रश्न उपस्थित करु शकते असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत मुलीने केलेल्या प्रश्नाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. मुलीचे म्हणणे असे होते की तिच्या वडीलांनी दुसरे लग्न केले मात्र तिच्या सावत्र आईने गैरफायदा घेत त्यांची संपत्ती स्वत:च्या नावावर केली.

पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर याचिकाकर्त्या मुलीच्या वडीलांनी सन 2003 मधे दुसरे लग्न केले होते. याप्रकरणी सावत्र आईने वडीलांची संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुलीने केला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमुद केले आहे की एक मुलगी आपल्या वडीलांच्या दुस-या लग्नाबाबत प्रश्न निर्माण करु शकते. याप्रकरणी याचिकाकर्ती मुलगी 66 वर्षाची आहे. या प्रकरणातील याचिकाकर्त्या मुलीच्या वडीलांचे निधन सन 2015 मधे झाले. या लग्नानंतर सन 2016 मधे धक्कादायाक बाब पुढे आली. सावत्र आईने ज्यावेळी याचिकाकर्त्या मुलीच्या वडीलांशी लग्न केले त्यावेळी ती अगोदरच विवाहिता होती. तिने घटस्फोट देखील घेतलेला नव्हता. याचिकाकर्त्या मुलीच्या वडीलांच्या मानसिकतेची आणि आजारपणाची लग्न करणा-या सावत्र आईला पुर्णपणे कल्पना होती. सर्व परिस्थितीचा गैरफायदा घेत संपत्ती बळकावण्यासाठी याचिकाकर्त्या मुलीच्या सावत्र आईने तिच्या वडीलांसोबत लग्न केले असल्याचा आरोप करण्यात आला होता. याउलट मुलगीच संपती बळकावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप तिच्या सावत्र आईने केला आहे.

मुलीने या प्रकरणी कुटूंब न्यायालयात याचिका दाखल करत 24 जुलै 2003 रोजी हे लग्न अवैध ठरवण्याची मागणी केली होती. दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने म्हटले की वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत प्रश्न निर्माण करण्याचा अधिकार मुलीला आहे. मात्र उच्च न्यायालयाने पुढे असे देखील म्हटले की लग्नाच्या वैधतेवर निर्णय घेण्याचा अधिकार कुटुंब न्यायालयाचा आहे. त्यामुळे कुटुंब न्यायालयाला सहा महिन्यांच्या आत या प्रकरणावर निर्णय घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here