मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी अहमदाबाद कनेक्शन

मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणाचा तपास आता गुजरात राज्यच्या दिशेने वळाला आहे. गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे एटीएसचे पथक जाऊन धडकले आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत आढळून आला होता. या मृत्यूच्या तपासाने आता वेग घेतला असून मुंबई पोलिस दलातून निलंबीत झालेला कर्मचारी विनायक शिंदे व बुकी नरेश गोर हे दोघेजण एटीएसच्या अटकेत आहेत. क्रिकेट बुकी नरेश गोर याने पाच मोबाईल सिमकार्ड निलंबीत स.पो.नि. सचिन वाझे यांच्यासह विनायक शिंदे या दोघांना दिले असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही सिमकार्ड गुजरात राज्यातील होती. याप्रकरणी एकुण चौदा सिमकार्ड देणारा गुजरात राज्यातील इसमास एटीएसने ताब्यात घेतले असून त्याची चौकशी प्रगतीपथावर असल्याचे समजते. तपासात एकुण आठ सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत.

मनसुख हिरेन यांची हत्या करणा-याला यातील एक सिमकार्ड देण्यात आले होते. मनसुख हिरेन यांना 4 मार्च रोजी सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी एक व्हाटसअ‍ॅप कॉल आला होता. निलंबीत पोलिस कर्मचारी व संशयीत विनायक शिंदे याने कांदीवली क्राईम ब्रॅंचचा पोलिस तावडे बोलत असल्याचे सांगून मनसुख हिरेन यांना घोडबंदर येथे बोलावले असल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. सचिन वाझे व विनायक शिंदे यांना देण्यात आलेली सिमकार्ड गुजरात राज्यातील असल्यामुळे या गुन्ह्याची पाळेमुळे गुजरात राज्यात असल्याचे देखील उघड झाले आहे. एटीएसच्या अटकेतील बुकी नरेश रामणीकलाल गोर व निलंबीत पोलिस कर्मचारी विनायक बाळासाहेब शिंदे 30 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here