कारमध्ये एकटे असाल तरी मास्क अनिवार्य – दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली : घरात अथवा कारमधे तुम्ही एकटे असले तरी देखील मास्क वापरणे बंधनकारक असल्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. अन्यथा दंड आकारला जाईल असे देखील दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. कार हे एक सार्वजनिक ठिकाण असल्याचे न्यायालयाने नमुद केले आहे. कारमधे एकटे असतांना मास्क लावण्याचे सांगण्यात येत असल्यामुळे त्याविरोधात चार याचिका न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्या चारही याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या असून हा निकाल दिला आहे. कार खासगी असली तरी तीची विविध ठिकाणी पार्कींगची जागा सार्वजनिक असते. मास्क हे सुरक्षा कवच असून ते घरी अथवा कारमधे एकटे असले तरी ते लावलेच पाहिजे असे न्या. प्रतिभा सिंह यांनी म्हटले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here