व्हाटस अ‍ॅप स्टेटसच्या वादातून गोळीबार

जळगाव : धमकी स्वरुपाचे स्टेटस व्हाटसअ‍ॅपवर ठेवल्यामुळे दोन गटात वादाची ठिणगी पडल्याची घटना आज दुपारी जळगाव शहरात घडली. दोन गटात झालेल्या वादात एका गटाने गोळीबार केल्यामुळे जळगाव शहरात खळबळ माजली आहे.

शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीत सारवान आणि शिंदे या दोन गटात हा वाद झाला. यातील शिंदे परिवारातील सदस्याने व्हाटसअ‍ॅपवर धमकीचे स्टेटस ठेवले होते. याबाबत सारवान गटातील सदस्यांनी शिंदे गटाला जाब विचारला होता. त्यात शिंदे गटातील सदस्याने फायरींग केली. फायरिंग करणारा शिंदे गटातील सदस्य फरार झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहे. घटनेची माहिती मिळताच शनीपेठ पोलिस स्टेशनसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाला पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी भेट देत पाहणी केली.

याप्रकरणी संशयीतांची नावे निष्पन्न झाली असून त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन्ही गटातील सदस्यांकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याचे कामकाज दुपारी सुरु होते. फायरिंग करणारा शिंदे गटातील सदस्य फरार असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहे. गोळीबार करणा-या शिंदे विरुद्ध सारवान गटाकडून फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यातील चौघांना चौकशीकामी दुपारी ताब्यात घेण्यात आले. या घटनेत जिवीतहानी झाली नसून एका जणास किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here