कत्तलीसाठी जाणारे पशुधन बचावले पोलिसांच्या सतर्कतेने

बुलढाणा: नाकाबंदी दरम्यान शिरसगाव कसबा पोलिसांच्या सतर्कतेने 62 पशुधनाचा जिव बचावल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. शिरसगाव पोलिस स्टेशनला याप्रकरणी पोलिस उप निरिक्षक मनोज सुरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा गु.र.न. 119/21 भा.द.वि. 5, 5 (अ)(ब), 9, 9(अ), म.प्रा.स.का., 11(1)(अ)(ह)(ड) पशु छळ प्र.का., 119 मु.पो.का.प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

21 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शिरसगाव कसबा पोलिसांच्या पथकाची बहिरम चेक पोस्ट परिसरात नाकाबंदी सुरु होती. या नाकाबंदी दरम्यान दहा चाकी कंटेनर (युपी 21 एएन 3550) हे संशयास्पद स्थितीत असल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने या कंटेनरला अडवून तपासणी केली असता त्यात 9 लाख 30 हजार रुपये किमतीचे 62 गोवंश आढळून आले. कंटेनर व जनावरांसह एकुण 31 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस उप निरीक्षक मनोज सुरवाडे यांच्या फिर्यादीनुसार हरी मोहन उर्फ हरीष रामचंद्र चौधरी (47) रा. कमलपुरा, कोटा रामगंजमंडी, राजस्थान यास ताब्यात घेत अटक करण्यात आली. स पो नि पंकज दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरिक्षक मनोज सुरवाडे, नाईक पो. कॉ. पुरुषोत्तम माकोडे, पो. कॉ. अंकुश अरबट यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. या कारवाईमुळे निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या पशूधनाचा जिव बचावल्याने पोलिस पथक कौतुकास पात्र ठरले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here