बस सेवा अत्यावश्यक सेवेसाठीच – डॉ. अनिल परब

मुंबई : कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेत राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार निर्बंध 22 एप्रिलच्या सायंकाळी 8 वाजेपासून 1 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील. सामान्य प्रवाशांसाठी एसटी प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. एसटी बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी राहील असे परिवहनमंत्री डॉ. अनिल परब यांनी म्हटले आहे. जिल्हांतर्गत व जिल्ह्याबाहेर एसटी बसेस धावणार असल्या तरीदेखील त्या फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच राहतील. एका जिल्ह्यतून दुस-या जिल्ह्यात प्रवासी जाणार असतील तर त्यांच्या हातावर शिक्के मारुन त्यांना चौदा दिवसांसाठी विलगीकरणात रहावे लागणार असल्याचे डॉ. परब यांनी म्हटले आहे. या सर्व बाबींवर विचारविनीमय करण्यासाठी मंत्रालयात बैठक होत आहे. मुंबईची जिवनवाहीनी समजल्य जाणा-या लोकलमधून सर्वसामान्य नागरिकांना प्रवासास बंदी घालण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here