फिर्यादीसोबत मद्याची पार्टी फौजदाराला भोवली

पुणे : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटकेतील आरोपींच्या नातेवाईकांसमवेत मद्याची पार्टी पोलिस उप निरीक्षकाला भोवली आहे. केवळ पार्टीच नव्हे तर मद्याच्या नशेत अल्पवयीन मुलीचा केलेला विनयभंग देखील या फौजदारास भोवला. विनयभंग व लैंगीक छळ केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या फौजदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर निलंबीत होण्याची वेळ आली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोस्को कायद्यानुसार सदर कठोर कारवाई केली आहे. दिपक माने असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस उप निरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या युनीट चार मधे कार्यरत असलेल्या फौजदार दिपक माने यांच्याकडून रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-यांविरुद्ध कारवाई सुरु होती. या कारवाई दरम्यान दोघा भावांना पकडण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिस उप निरीक्षक दिपक माने याची आरोपींच्या नातेवाईकांसोबत ओळख परिचय वाढला. या ओळखीचा गैरफायदा घेत पोलिस उप निरीक्षक दिपक माने याने 20 एप्रिल रोजी आरोपींच्या नातेवाईकांच्या फ्लॅटवर मद्याची पार्टी केली. याठिकाणी फौजदार माने व फिर्यादीचा नातेवाईक असे दोघे जण मद्यपान करत बसले. त्याठिकाणी फिर्यादीच्या सोळा वर्षाच्या बहिणीला त्याने बोलावून घेतले. त्या अल्पवयीन मुलीसोबत त्याने अश्लील वर्तन करत तिची छेड देखील काढली. तुम्हा सर्वांना आरोपी करतो असे म्हणत त्याने मद्याच्या नशेतच धमकी दिली. या घटनेची माहिती एका महिलेने वरिष्ठ पोलिस अधिका-यांना तातडीने कळवली. या तक्रारीची वरिष्ठांनी तातडीने दखल घेत शहानिशा केली. त्यात पोलिस उप निरीक्षक दिपक माने हा दोषी आढळून आला. त्याला तात्काळ निलंबीत करण्यात आले व रितसर गुन्हा देखील दाखल करण्यात आला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here