आईसमोरुन मुलीला पळवून नेत तरुणाने केला अत्याचार

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : जळगाव जिल्ह्यतील वरणगाव पासून जवळच असलेल्या वेल्हाळे या गावातील एका अल्पवयीन मुलीला तिच्या आईसमक्ष तरुणाने पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी वरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरणगाव नजीक वेल्हाळे येथील एका पंधरा वर्षाची मुलगी शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर आली असता तिला मोटारसायकलवरील दोघांनी पळवून नेले. त्यानंतर नशिराबाद येथील एका शेताच्या झोपडीत नेत अत्याचार केला. याप्रकरणी संशयीत कृष्णा गायकवाड व त्याला गुन्ह्यात मदत करणारा त्याचा साथीदार रविण खाटीक या दोघांविरुद्ध पोस्को अंतर्गत वरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here