आधारकार्ड शिवाय रवी पुजारीला मिळाली लस

नाशिक : दहा वर्षापुर्वी नाशिक शहरात खंडणी वसुलीसाठी कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारी याने गोळीबार केला होता. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारी यास मुंबई क्राईम ब्रॅंचकडून आज गुरुवारी नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या न्यायालयीन कोठडीत रवानगीचे आदेश दिले. गॅंगस्टर रवी पुजारी याचे कोरोना लसीकरण झाले नसल्याची बाब तपास अधिका-यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या ओघाने रवी पुजारीकडे आधारकार्ड नसल्याची बाब पुढे आली.

आपण भारतीय नागरीक नसून सेनेगालचा नागरीक असल्याचे रवी पुजारीने न्यायालयास सांगीतले. त्यामुळे आपणाकडे आधारकार्ड नसल्याचे त्याने सांगितले. कोविड लस घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर आधार कार्ड लिंक करणे आवश्यक असल्यामुळे रवी पुजारीचे सुरक्षेच्या दृष्टीने लसीकरण करायचे कसे हा प्रश्न या निमीत्ताने निर्माण झाला. न्यायालयाने स्वतंत्र आदेश काढत रवी पुजारी यास कोरोना प्रतिबंधक लस देऊन जेलमधे न्यावे असे म्हटले. ऑर्थर रोड कारागृह प्रशासनाच्या आदेशानुसार कोरोना लसीकरणाशिवाय रवी पुजारीला कारागृहात प्रवेश मिळणार नव्हता. अखेर लसीकरणानंतर रवी पुजारी याची ऑर्थर रोड कारागृहात कडेकोट बंदोबस्तात रवानगी झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here