जामनेर शहरात आयपीएल सट्ट्यावर धाड

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : जामनेर शहरातील पाचोरा रस्त्यावरील एका घरात आयपीएल सट्टा बेटींगवर बुधवारी रात्री जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला आहे. या छाप्यात 14 संशयीतांसह 5 लाख 30 हजार रुपयांचा एकुण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 8 दुचाकींसह् 63 हजार रुपयांची रोकड, विविध प्रकारचे 27 मोबाईल, टीव्ही सेट, संगणक व लॅपटॉप अशा मुद्देमालाचा त्यात समावेश आहे. पोलिसांनी अशोक उखर्डू हिवराळे, अक्षय प्रताप पाटील, विकास सुरेश माळी, अजय विठ्ठल माळी, शुभम संजय पाटील, संदीप देवीदास खडके, सतीष लक्ष्मण माळी, जहीर खान हनीफ खान, भुषण सुरेश कवळकर, किरण अनिल जाधव, धनराज प्रल्हाद साबळे, उमेश दिलीप जगताप (सर्व राहणार जामनेर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. स्वप्निल नाईक यांच्या फिर्यादीनुसार भाग 5 गु.र.न. 139/21 जुगार कलम 4, 5, 12 अ , आपत्ती व्यवस्थापन कायदा 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. स्वप्निल नाईक, पोलिस उप निरीक्षक रविंद्र गिरासे, हे.कॉ. सुनिल दामोदरे, राजेश मेंढे, संजय हिवरकर, जयंत चौधरी, संतोष मायकल, चालक राजेंद्र पवार आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास जामनेर पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रताप इंगळे करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here