सहाय्यक फौजदाराचा तडीपार गुंडाने केला खून

पुणे : पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवर तडीपार असलेला गुंड प्रवीण महाजन याने फरासखाना पोलीस स्टेशनमधील सहाय्यक फौजदार समीर सय्यद यांचा मध्यरात्री खून केला आहे. पोलिसांनी महाजन यास अटक केली असून या घटनेने पुणे पोलिस दलात खळबळ माजली आहे.

बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजजवळ मध्यरात्री एकच्या दरम्यान ही घटना घडली आहे. खडक पोलिस लाइन मधे राहणारे एएसआय समीर सय्यद (48) हे बंदोबस्ताचे कामकाज पुर्ण करुन मध्यरात्री घरी निघाले होते. दरम्यान श्रीकृष्ण टॉकीजजवळ प्रवीण महाजन या तडीपार गुंडाने त्यांचा खून केला. हा खून प्रविण महाजन याने नेमका कोणत्या कारणासाठी केला याचा तपशील अद्याप समजू शकला नाही.

या दर्दनाक घटनेची माहिती समजताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. प्रविण महाजन यास तातडीने ताब्यात घेण्यात आले. सय्यद यांचा मृतदेह पोस्ट मॉर्टमकामी रुग्णालयात रवाना करण्यात आला. एक वर्षापासून तडीपार असलेल्या प्रवीण महाजन याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा तपास सुरु असतांना नजीकच्या बुधवार पेठेत एका वारांगणेचा देखील खून करण्यात आल्याची घटना घडल्याचे समजते. एकाच वेळी दोन खून झाल्याने खळबळ माजली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here