डंपरच्या धडकेत मृत्युप्रकरणी गुन्हा दाखल

On: May 6, 2021 9:10 PM

जळगाव : तालुक्यातील धानवड – चिंचोली रस्त्यावर काल डंपरच्या धडकेत बुलेटधारकाचा मृत्यु, बुलेटचे नुकसान व सह प्रवासी जबर जखमी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला डंपर चालकाविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी असलेले शिवाजी काळु पाटील व त्यांचा सहकारी आकाश दुर्गा बारेला हे दोघे जण बुलेटने जळगाव येथून धानवडच्या दिशेने जात होते. यावेळी भरधाव वेगातील डंपरच्या धडकेत शिवाजी पाटील हे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान मयत झाले होते तर सहप्रवासी आकाश बारेला हा गंभीर जखमी झाला. डंपरच्या धडकेत बुलेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या घटनेप्रकरणी कैलास अभिमन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला डंपरचालक नितीन अरुण गोडसे याच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment