मोटारसायकलीसह दोघा चोरट्यांना अटक

On: May 8, 2021 5:07 PM

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या निर्देशाखाली तपास पथकाने चोरीच्या दोन मोटारसायकली व दोघा चोरट्यांना शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. डिगंबर रविंद्र सोनवणे (22) व सागर दिनकर सपकाळे (22) दोन्ही रा. गोरगावले खुर्द तालुका चोपडा जिल्हा जळगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटकेतील दोघांनी चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. चोपडा शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात त्यांचा सहभाग उघड झाला आहे. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची पुर्तता करत त्यांना चोपडा शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. प्रदिप पाटील, सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, विजय पाटील, अविनाश देवरे, दिपक शिंदे व पंकज शिंदे आदींनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment