लॉकडाऊनचा पुढील निर्णय 15 मे नंतर

On: May 9, 2021 11:08 AM

जालना : महाराष्ट्रातील 36 पैकी 12 जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी काही जिल्ह्यात मात्र रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. अशा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यात लॉकडाऊन वाढवायचा अथवा नाही याबाबतचा निर्णय 15 मे नंतर घेतला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसाला 60 ते 65 हजाराच्या घरात आहे. अजूनही राज्याचा कोरोना पॉझीटीव्हिटी रेट हवा तसा कमी झालेला नाही. हा रेट बारा जिल्ह्यात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. काही जिल्ह्यात स्थिर आहे तर काही जिल्ह्यात वाढता आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय 15 मे नंतर घेतला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment