झन्ना मन्ना खेळणारे तिघे अटकेत

On: May 10, 2021 7:36 PM

जळगाव : सावदा पोलिस स्टेशनच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात लोहारा कुसुंबा शेतशिवारातून झन्ना मन्ना पत्त्यांचा खेळ खेळणा-या तिघांना 9 मे रोजी अटक केली आहे. तिघांवर सावदा पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यादरम्यान आठ ते दहा जण फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. सातपुडा जंगल परिसरातील जलालशा बाबा दर्गा परिसरात मिळालेल्या माहितीनुसार हा छापा टाकण्यात आला होता.

तोशिफ शेख मोहम्मद (30) रा.नागझिरी, राजेंद्र रोहिदास वाघ (40) रा उटखेडा व मनोज जयराम महाजन (40) रा.निंबोल अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून 11 हजार 870 रुपये रोख व 1 लाख 10 हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी व जुगाराचे साहित्य असा एकुण 1 लाख 21 हजार 870 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक राजेंद्र पवार, युसूफ तडवी, सुनिल कुरकुरे, मोहसीन पठाण, विशाल खैरनार आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment