नाशिकला तृतीयपंथियाचा तोडला हात

On: May 11, 2021 5:21 PM

नाशिक : नाशिक शहराच्या पंचवटी परिसरात एका तृतीयपंथीयावर कोयत्याने करण्यात आलेल्या जिवघेण्या हल्ल्यात त्याचा एक हात पुर्णपणे तुटला असून परिसरात खळबळ माजली आहे. या हल्ल्यात तृतीयपंथीयाच्या डोक्यावर व अंगावर गंभीर जखमा झाल्या आहेत. याशिवाय तृतीयपंथीयाच्या जवळ असलेले सोन्याचे दागीने व रोकड देखील हल्लेखोरांकडून लांबवण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने नाशिक शहरात खळबळ माजली आहे. तृतीयपंथीवर झालेला हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे म्हटले जात आहे. हल्लेखोराच्या मागावर पोलिस असून तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment