पुण्यात तरुणाच्या खूनाचा थरार सीसीटीव्हीत कैद

On: May 16, 2021 6:53 PM

पुणे : पुणे येथे आज दुपारी तिन ते चार तरुणांनी एका तरुणाला एकटे गाठत त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. पाणी पुरवठा करण्याच्या वादातून हा खून झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


अतुल भोसले असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून तो एका कंपनीत टॅंकरने पाणी पुरवठा करत असल्याची माहिती पुढे आली आहे. या कंपनीत मी पाणी पुरवठा करतो असे आरोपी अक्षय शिवले याने त्याला फोन करुन धमकावले होते. त्यावरुन दोघात वाद झाला होता अशी माहिती पोलिस अधिकारी अरविंद पवार यांनी दिली आहे.
भर रस्त्यात दुपारच्या वेळी अतुल भोसले याला गाठत अक्षय शिवले व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर कोयत्यानेवार केल्याचे सीसीटिव्हीत दिसत आहे. जखमी अतुल भोसले यास दवाखान्यात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment