तरुणीच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणी फरार आरोपी अटकेत

On: May 17, 2021 6:45 PM

जळगाव : एकाच मुलीवर दोघांचे प्रेम असल्याच्या वादातून तरुणासह त्याच्या समर्थक गटाने दुस-या तरुणासह त्याच्या कुटूंबावर चाल करत शिवीगाळ व मारहाणीची घटना कुसुंबा येथे 27 फेब्रुवारी रोजी घडली होती. या घटनेत एका गटातील तरुणाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने दुस-या तरुणाच्या घरात अनाधिकारे प्रवेश करत सामानाची तोडफोड, शिवीगाळ व मारहाण केली होती. या घटनेत एकाकी पडलेल्या तरुणासह त्याच्या परिवारातील सदस्य जखमी झाले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला शुभम कोळी, दीपक कोळी, भुषण सुकदेव ठाकरे, संतोष उर्फ बव्या सुभाष कोळी, अक्षय दीपक जाधव, आकाश कोळी, भीकन कोळी व इतर काही साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेनंतर फरार झालेल्या एका अल्पवयीन आरोपीसह दिनेश उर्फ गोलू मधुकर पाटील व संतोष उर्फ बब्या सुभाष कोळी यांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोलिस नाईक मिलींद सोनवणे, पो.कॉ. हेमंत कळसकर, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील यांनी या गुन्ह्याच्या तपासात सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment