तलावाकाठी फोटो सेशन करणा-या तरुण तरुणींवर कारवाई

On: May 17, 2021 8:32 PM

जळगाव : संचारबंदी असतांना जळगावच्या मेहरुण तलावानजीक विनामास्क एकत्र येत फोटोसेशन करणा-या तरुण तरुणींवर कायद्याचा बडगा दाखवत कारवाई केली आहे. कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असतांना काही तरुण तरुणींचा समुह विनामास्क फोटोसेशन करत असल्याची माहिती मिळताच सदर कारवाई करण्यात आली. फोटोसेशन करणारे तरुण जळगाव, धोबी वराड – जळगाव, रामेश्वर कॉलनी जळगाव, सुप्रिम कॉलनी जळगाव, मेहुणबारे ता. चाळीसगाव तसेच पिंप्राळा येथील होते तर तरुणी जळगाव येथील होत्या. पो.कॉ. नामदेव देवीदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सर्व तरुण तरुणींविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

जळगाव उप विभागाचे सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांना मिळालेल्या माहितीनुसार करण्यात आलेल्या या कारवाईत पो.उ.नि. रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोलिस नाईक गणेश शिरसाळे, मुकेश पाटील, योगेश बारी, निर्भया पथकातील सहायक फौजदार मंजुळा तिवारी, पो.कॉ. सुनिता कुरे, नापोकॉ किरण अवचार, वैशाली बाविस्कर, वर्षा डोंगरदिवे, कविता बारवाल, शहर वाहतुक शाखेतील जितेंद्र पाटील, सुनिल नाईक, मंगेश पाटील, आरसीपी पथकातील पो.कॉ. राहुल पाटील, आयेश शेख, प्रविण लोहार विशाल तायडे यांनी कारवाईत सहभाग घेतला. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुण तरुणींच्या ताब्यातून मोबाईलसह दुचाकी वाहने असा एकुण 4 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment