चोपडा येथे गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

On: May 18, 2021 10:10 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा या तालुक्याच्या ठिकाणी चोपडा शहर पोलिसांनी टाकेलेल्या छाप्यात साडेचार लाख रकमेचा गुटखा व चार लाख रुपयांचे पिकअप वाहन असा एकुण साडेआठ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईत तिघे आरोपी अटक करण्यात आले आहेत.

दिनांक 17 व 18 मे रोजी रात्र गस्तीदरम्यान वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या पथकाने शहरातील पाटीलगढी भागात छापा टाकला. या छाप्यात रमाकांत बाबुराव मराठे यांच्या ताब्यातुन 51 हजार 520 रुपये किमतीचा विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला. ताब्यातील बाबुलाल मराठे याने दिलेल्या माहितीनुसार सुत्रधार राहुल विश्वास गुजराथी (गुजराथी गल्ली, चोपडा) याला देखील ताब्यात घेत अटक करण्यात आली. अटकेतील दोघांवर चोपडा शहर पोलीस स्टेशनला भा.द.वि. 328, 272, 273 नुसार कारवाई करत अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment