प्लॅस्टीक कंपनीतील चोरी प्रकरणी आरोपी ताब्यात

On: May 19, 2021 5:55 PM

जळगाव : जळगाव एमआयडीसी व्ही सेक्टर परिसरातील महेश प्लास्टिक इंडस्ट्रीज या कंपनीत रोख रकमेसह एकुण तिस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरी 13 मे रोजी झाली होती. सदर चोरीचा प्रकार 15 मे रोजी उघडकीस आल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक तुषार राणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सफौ अतुल वंजारी  पोलीस नाईक इम्रान सय्यद पोका . गोविंदा पाटील. सुधीर साळवे, पो.कॉ. विजय बावस्कर आदी करत होते. तपासादरम्यान घटनास्थळी चपलेचे ठसे मिळून आले होते. चपलेच्या ठशांसह इतर माहितीच्या आधारे तपासाला गती देण्यात आली होती. सदर चोरीचा प्रकार सुप्रिम कॉलनी परिसरातील अरविंद अरुण वाघोदे याने केला असल्याची गोपनीय माहीती तपास पथकातील कर्मचारी इमरान सैय्यद यांना समजली. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक इमरान सैय्यद, पो.कॉ. गोविंदा पाटील, सुधीर साळवे आदींनी अरविंद अरुण वाघोदे याला मुद्देमालासह शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात यश मिळवले. ताब्यातील व अटकेतील अरविंद वाघोदे याच्यावर यापुर्वी देखील विस लाख रुपये चोरीचा गुन्हा दाखल आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment