चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

On: May 19, 2021 7:13 PM

जळगाव : मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला चोरीच्या गुन्ह्यात दाखल व फरार असलेला आरोपी प्रदिप दिलीप भिल्ल (रा. पिंप्री अकराऊत – मुक्ताईनगर) यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली आहे. आरोपी प्रदिप भिल्ल हा घरी आला असून तो शेतीकाम करत असल्याची माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना मिळाली होती.

अटकेतील प्रदिप भिल्ल याच्या विरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गु.र.न. 223/18 भा.द.वि. 379, 34 नुसार गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा घडल्यापासून व दाखल झाल्यापासून तो फरार होता. पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक ओंकार महाजन,पोलिस नाईक दिपक शांताराम पाटील, नंदलाल दशरथ पाटील, प्रमोद अरुण लाडवंजारी, पो.कॉ. भगवान तुकाराम पाटील, सचिन प्रकाश महाजन यांनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील आरोपी प्रदिप भिल्ल यास पुढील तपासकामी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment