जळगाव : जामनेर पोलिस स्टेशनला मोटार सायकल चोरीच्या दाखल गुन्ह्यातील दोघा आरोपींना चोरीच्या मोटारसायकलीसह ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. सनी अशोक वाविस्कर (21) पहुर-कसबे, साथ बाजार जवळ, पहुर ता.जामनेर आणि अनिकेत कडुबा चौथे (21) पहुर-कसबे , होळी चौक पहुर ता.जामनेर अशी अटकेतील दोघा आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.राजेंद्र पाटील, स.फो.अशोक महाजन, पो.हवा.अनिल इंगळे, अनिल देशमुख, कमलाकर बागुल, रमेश चौधरी, प्रदिप पाटील, जयंत चौधरी, पो.ना.दिपक चौधरी यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपासकामी दोघा आरोपींना जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.









