आज पुन्हा एका जणाचा बुडून मृत्यू

On: July 9, 2020 2:28 PM

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील साकेगाव येथील वाघूर नदीच्या पात्रात आज पुन्हा एका जणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एक दिवसाच्या अंतराने सलग दुसरी घटना याच नदी पात्रात घडल्याने हा चिंतेचा विषय झाला आहे.मयत व्यक्तीचे नाव विनोद सुरेश सोनवणे (३९ ) असल्याची माहिती समोर येत आहे.

वाघूर नदीच्या नवीन पुलाच्या खाली असलेल्या डोहात आज मृतदेह तरंगतांना आढळून आला. या प्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment