पोलिस निरिक्षकाला लाच देणारे जुगार माफीया अटकेत

On: May 22, 2021 11:52 AM

अकोला : अकोला येथील दहीहंडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांना लाच देणा-या तिघा जुगार अड्डा चालकांना अटक करण्यात आली आहे. जुगार अड्डा चालवण्यासाठी दरमहा पन्नास हजार रुपयांची लाच देऊ करणा-या तिघा जुगार माफीयांना अकोला एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. लाच देणारेच या रिव्हर्स ट्रॅपमधे अडकल्याने अकोला शहर व जिल्ह्यात खळबळ माजली आहे. शिवा गोपाळराव मगर, अभिजीत रविकांत पागृत व घनश्याम गजानन पागृत अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जुगार अड्डा चालकांची नावे आहेत. लाच देतांना एसीबी पथकाने तिघांना रंगेहाथ अटक केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment