कंगनाच्या बॉडीगार्ड विरुद्ध बलात्काराचा गुन्हा

On: May 22, 2021 12:35 PM

मुंबई : वादग्रस्त बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत हिचा अंगरक्षक कुमार हेगडे यांच्याविरुद्ध मुंबईच्या डी.एन.नगर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तिस वर्षाच्या ब्युटीशियन महिलेने हेगडे विरुद्ध हा बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हेगडे याने तिला लग्नाचे आमिष दाखवत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले असल्याचे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे. जुन महिन्यात एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान या महिलेची हेगडे सोबत भेट आणि परिचय झाला होता. आई आजारी असल्याचे कारण सांगत हेगडे याने या महिलेकडून पन्नास हजार रुपये घेतले होते. त्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क केला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment